Breaking News

गड़चिरोली पोलीस दलातर्फे १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला महाराष्ट्र दर्शन सहल योजना राबविण्यात आला

गड़चिरोली पोलीस दलातर्फे १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला महाराष्ट्र दर्शन सहल योजना राबविण्यात आला

गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

गढ़चिरोली- ता.५: जिल्हा पोलिस दलातर्फे १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला महाराष्ट्र दर्शन सहल योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत आज २३ वी सहल रवाना करण्यात आली. या सहलीत ८१ मुला-मुलींची निवड करण्यात आली असून, त्यात ४ नक्षलपीडित, तर ५ नक्षल्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.

अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी हिरवी झेंडी दाखवून सहलीला रवाना केले. मुला-मुलींच्या मनातील नक्षल्यांची भीती नाहिशी व्हावी व त्यांना राज्यात झालेली औद्योगिक प्रगती, सामाजिक व शैक्षणिक विकास बघता यावा, तसेच राज्याच्या इतर भागातील रुढी व परंपरांचे दर्शन व्हावे, हा या सहलीचा हेतू आहे. २०१३ पासून दुर्गम भागातील ८०८ मुले व ८१९ मुली अशा एकूण १६२६ मुलामुलींनी या सहलीचा लाभ घेतला आहे. यंदाची ही चौथी सहल आहे. ही आदिवासी किशोरवयीन मुले राज्य शासनाचे अॅम्बॅसॅडर म्हणून नक्षलप्रभावीत क्षेत्रात बदल घडवतील, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …