Breaking News

*कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा* *धर्मराज शैक्षणिक संस्थेची आग्रही मागणी ; विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या*

*कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करा*

*धर्मराज शैक्षणिक संस्थेची आग्रही मागणी ; विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध शिष्य वृत्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रे तयार करावे लागतात. यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करावे, अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे भिमराव शिंदे मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसिलदार पारशिवनी यांच्याकडे केली आहे.


नुकतेच शैक्षणिक सत्र २०२२ – २०२३ ला सुरूवात झाली आहे. अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त जाती व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासना तर्फे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती (अज), डॉ बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पुर्व शिष्यवृत्ती (भटक्या विमुक्त व ओबीसी), अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती (सर्व जाती), कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती या सारख्या विविध शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सप्टेंबर महिन्या पर्यंत शाळेत सादर करावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांना जाती चे प्रमाणपत्र, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखले याची आवश्यकता असते. ही वेळखाऊ प्रक्रिया असल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करू शकत नाही. त्यामुळे हक्काच्या लाभा पासुन शालेय विद्यार्थी वंचित राहतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्रातील आर्थिक लाभाचे नुकसान होऊ नये यासाठी कन्हान येथे विद्यार्थी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी धर्मराज शैक्षणिक संस्थे तर्फे श्री भिमराव शिंदे मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळाने पारशिवनी तहसिलदार प्रशांत सांगळे यांच्याकडे केली. यावेळी शिष्टमंडळात धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पत्रकार धनंजय कापसीकर, कांद्री ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे ग्रामीण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी जितेंद्र भांडेकर यांचा समावेश होता.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …