Breaking News

*पाटणसावंगी टोल नाक्यावर 4 आरोपींना फिल्मी स्टाईल अटक* *नागपूर शहर गुन्हे शाखेची कारवाई*

*पाटणसावंगी टोल नाक्यावर 4 आरोपींना फिल्मी स्टाईल अटक*

*नागपूर शहर गुन्हे शाखेची कारवाई*

पाटणसावंगी – येथील महामार्गांवर असलेल्या टोल नाक्यावर नागपूर शहर गुन्हे शाखेने सापडा रचून 4 कुख्यात गुन्हेगारांना फिल्मी स्टाईल अटक केली. ही कारवाही शनिवारी दुपारी 3 वाजता केली गेली.
मागील काही दिवसापासून शहरासह जिल्ह्यात घर फोडीचे प्रकार वाढले आहे.त्या संबंधी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने याचा तपास सुरु केला होता.
शहर गुन्हे शाखेच्या टीम ला शहरात घरफोडी करण्याच्या उद्देशाने मध्यप्रदेशातून 4 कुख्यात गुन्हेगार येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. नागपूर शहर गुन्हे शाखेने येथील टोल नाक्यावर येणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी सापडा रचला. आरोपींच्या गाडी मागे मध्यप्रदेश च्या सिमेपासून शहर गुन्हे शाखेचे पोलीस पाठलाग करत येत होते. आरोपी चोरीची गाडी क्र. MH 31 BK 5786 ने येत होते.

येथील टोल नाक्यावर पोहोचताच तेथे अगोदरच तयार असलेल्या पोलिसांनी धावा घेतला, आरोपीच्या गाडीच्या काचा फोडल्या व गाडीत असलेल्या 4 ही आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळ घरफोडीसाठी उपयोगी असणारे साहित्य मिळाले. ह्या 4 ही आरोपीवर भारतात विविध ठिकाणी मोठमोठी घरफोडी व डकेटी चे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्राकडून माहित झाले असून ही कारवाही नागपूर शहर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया यांच्या मार्गदर्शनात 20 पोलिसांच्या पथकाने केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …