*माधवबाग कोंढाळी हॉस्पिटलचे सौजन्याने- ज्येष्ठांची निशुल्क आरोग्य तपासणी*

काटोल –ज्येष्ठांचे शारीरिक व मानसिक आरोग्याची जाण ठेवून दिनांक 10 जुलै, 2022 ला मंडळाचे काटोल येथील विरंगुळा केंद्रात माधवबाग कोंढाळीचे सौजन्याने निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे यशस्वीतेसाठी माधवबाग हॉस्पिटल कोंढाळीचे डॉक्टर श्री गौरव शेळके,प्रशासकीय अधिकारी श्री प्रशांत ठाकरे व त्यांची जम्मू उपस्थित होती.

मधुमेह, रक्तदाब हे आजार जडल्यास हृदयविकार येण्याची दाट शक्यता असते. त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी आहार विहार व योग्य उपचाराची गरज आहे व हेच कार्य माधवबाग हॉस्पिटल येथे केले जाते तेव्हा ज्येष्ठांनी लाभ घ्यावा असे उद्गार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी काटोल नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ वैशालीताई ठाकूर यांनी व्यक्त केले, मंचावर उपस्थित शिबिराच्या उद्घाटीका सौ, वैशालीताई ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष श्री रमेशजी तिजारे, उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे ,सचिव श्री गजाननराव भोयर, संचालक श्री महादेवराव नखाते, वरिष्ठ महिला सदस्या श्रीमती निर्मलाताई कोंडे, डॉ. शेळके व श्री प्रशांत ठाकरे उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
शिबिरात इसीजी, बीपी, आरबीएस, एसपीओ-२ या चाचण्या निशुल्क करण्यात आल्या. आजार जडू नये यासाठी काय काळजी घ्यावी तसेच माधवबाग येथील उपलब्ध उपचाराची माहिती डॉक्टर शेळके यांनी दिली.या शिबिराचा 65 ज्येष्ठांनी लाभ घेतला.
20 ज्येष्ठांचा सामूहिक वाढदिवस साजरा करून त्यांना मंडळाद्वारे पेन -डायरी सप्रेम भेट देण्यात आली. श्रीमती निर्मलाताई कोंडे यांनी त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मंडळास साऊंड सिस्टिम सप्रेम भेट देऊन, त्यांनी पुन्हा एकदा दातृत्वाचे दर्शन घडविले. तसेच उपस्थितांना बर्फी वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांनी पार पाडले तसेच शिबिराचे संयोजन श्री प्रशांत ठाकरे यांनी उत्तमपणे केल्यामुळे जेष्ठानी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे कोषाध्यक्ष श्री रुपराव राऊत,संघटन सचिव श्री पंजाबराव दुधाने, संचालक श्री मोतीरामजी वंजारी, जितेंद्र गोमासे ,रामदास कळंबे ,सुरेश येवले यांनी विशेष सहकार्य केले
Maharashtra News Media सच की आवाज