Breaking News

*कन्हान येथे स्वर्ग श्री शामराव श्यामाजी गिरडकर यांना दिली श्रद्धांजलि* *तेली समाज कन्हान – कांद्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे स्वर्ग श्री शामराव श्यामाजी गिरडकर यांना दिली श्रद्धांजलि*

*तेली समाज कन्हान – कांद्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – कांद्री तेली समाज द्वारे पुर्व संस्थापक अध्यक्ष स्वर्ग श्री शामराव श्यामाजी गिरडकर यांच्या १६ व्या पुण्यतिथि निमित्य श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन संताजी सभागृह येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष शरद डोणेकर यांच्या हस्ते स्वर्ग श्री शामराव श्यामाजी गिरडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व संस्थेच्या पदाधिकार्यांनी शामराव श्यामाजी गिरडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि वाहुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णराव सराटकर , सचिव अशोक हिंगणकर , वामन देशमुख , डॉ लक्ष्मीकांत गिरडकर , माजी अध्यक्ष पतिराम देशमुख , कांद्री ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बावनकुळे , शिवाजी चकोले , गणेश सरोदे , प्रवीण आकरे , सुरेश आंबागडे , सोनु कापसे सह आदि समाज बांधव व नागरिक उपस्थित होते .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …