*ॿळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार समारोह कार्यक्रम थाटात संपन्न*
*विद्यार्थांना शील्ड , प्रमाण पत्र व पुष्प गुच्छ देऊन केला सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – कांद्री येथील बळीरामजी दखने हायस्कुल येथे दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा ठमके यांच्या हस्ते व प्रमुख अतिथि नगरसेवक राजेश यादव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर प्रथम अपेक्षा रंगारी ९२.८०% द्वितीय जानव्ही कुरडकर ९१.६०% द्वितीय रिया वडे ९१.६९% तृतीय साक्षी गेडाम ८९.६०% चतुर्थ कांचन कावळकर ८९.२०% पंचम चैतन्य विश्वकर्मा ८७.८०% सहित एकुण दहा विद्यार्थांना शील्ड , प्रमाण पत्र , व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा ठमके व पर्यवेक्षक ज्ञानप्रकाश यादव यांनी विद्यार्थांना व पालकांना मार्गदर्शन करुन विद्यार्थांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या ।

या प्रसंगी सचिन अल्लडवार , मनोजसिंह चौहान , ज्ञानेश्वर बांबल , हरीहर डहारे , अमित थटेरे , यतीन पशिने , जया वानखेडे , पप्पुराम चौधरी , विजय खडसे , राजेश हटवार , नारायण बाजनघाटे , दिलीप हटवार , इंदु कनोजे , पुष्पा गावंडे सह आदि पालक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुरेश बेलनकर , दिलीप धनविजय सहित आदि शिक्षकांनी सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन त्रिशुल गवळी व आभार भाग्यश्री नखाते यांनी मानले .
Maharashtra News Media सच की आवाज