*ब्रेकिंग न्यूज*
*नवेगांव खैरी पेंच धरणाचे १६ गेट उघडले*
*नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील नवेगांव खैरी पेंच धरणात अचानक पाणी वाढल्याने धरणाचे १६ ही दरवाजे उघडण्यात आले असुन कन्हान नदी पात्रात विसर्ग केला जात असल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे पेच धरणात मंगळवार ला सकाळ पर्यंत ८७% जलसाठा होता . त्यानंतर मंगळवार ला दुपारी व रात्री जोरदार पाऊस झाल्याने पेंच धरणात अचानक पाणी वाढल्याने धरणाचे १६ दरवाजे १ फीट व २ फीट ने उघडण्यात आले असुन कन्हान नदी पात्रात विसर्ग केला जात असल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा एन एस सावरकर , तहसीलदार प्रशांत सांगडे , नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , पोलीस निरीक्षक विलास काळे सह संबंधित अधिकार्यांनी दिला आहे .