*पारशिवनी तालुक्यात एकुण ३७५.२५ मिमी पावसाची नोंद* *नवेगांव खैरी पेंच धरणात ८५% टक्के पाणी , नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *राजस्व आणि कृषि विभागाच्या अधिकार्यांनी केली नुकसान ग्रस्त गावांची पाहनी*

*पारशिवनी तालुक्यात एकुण ३७५.२५ मिमी पावसाची नोंद*

*नवेगांव खैरी पेंच धरणात ८५% टक्के पाणी , नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

*राजस्व आणि कृषि विभागाच्या अधिकार्यांनी केली नुकसान ग्रस्त गावांची पाहनी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यात मागील सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी , नाले दुथळी भरुन वाहत असुन आदिवासी क्षेत्रात आणि पेंच नदी काठावरील राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शनात राजस्व आणि कृषि विभागाच्या अधिकार्यांनी नरहर व बनेरा या गावात शेतकऱ्यांचा झालेल्या नुकसान ग्रस्ताची पाहनी करीत पंचनामा करुन वरिष्ठ अधिकार्यांना रिपोर्ट सादर केली आहे .


सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे रविवार पर्यंत आमडी विभागात ३७५.१ मिमी , पारशिवनी विभागात ४२२.३ मिमी , नवेगांव खैरी विभागात ३४२.४ मिमी , कन्हान विभागात २६१.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असुन चार ही विभागात एकुण ३७५.२५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे . त्यामुळे नरहर व बनेरा गावांचा संपर्क टुटला असुन दोन्ही गावातील शेता मध्ये लावण्यात आलेली पीक व शेती उपयुक्त वस्तु आणि शेतकर्यांची दोन गाय , बैलबंडी हे रविवार ला पाण्यात वाहुन गेल्याने शेतकरी अडचणीत आल्याने गावातील नागरिकांनी संबंधित अधिकार्यांना नुकसान भरपाई ची मागणी केली आहे . सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे नवेगांव खैरी पेंच धरणात ८५% टक्के च्या वर पाणी भरल्याने रविवार ला पहाटे च्या सुमारास पेंच धरणाचे १६ दरवाजे पैकी १ दरवाजा खोलण्यात आल्याने कन्हान नदी च्या पाणी पात्रात वाढ झाल्याने नदी दुथळी भरुन वाहत असल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …