Breaking News

*ब्रेकिंग न्यूज* *पेंच धरणचे दरवाजे उघडले , पेंच व कन्हान नदी ला पुर , शेतातील पिंकाचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान* *तालुक्यात एकुण ४९९.६७५ मिमी पावसाची नोंद* *उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केला दौरा* *नदी काठावरील गावांना व नागरिकांना दवंडी फिरवुन सर्तकतेचा इशारा*

*ब्रेकिंग न्यूज*

*पेंच धरणचे दरवाजे उघडले , पेंच व कन्हान नदी ला पुर , शेतातील पिंकाचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान*

*तालुक्यात एकुण ४९९.६७५ मिमी पावसाची नोंद*

*उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केला दौरा*

*नदी काठावरील गावांना व नागरिकांना दवंडी फिरवुन सर्तकतेचा इशारा*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – मध्यप्रदेश , महाराष्ट्र सह संपुर्ण जिल्ह्यात व तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील पेंच धरणाचे १६ दरवाजे बुधवार ला उघडण्यात आल्याने कन्हान आणि पेंच नद्यांना मोठ्या प्रमाणात पुर आला असुन गावांत पाणी घुसल्याने संपर्क तुटला असुन नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे पेंच नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नागरिकांनी सूचनांचे पालन करून खबरदारी घ्यावी असे कडकडीचे आवाहन रामटेक उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते व पारशिवनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी केले आहे .

मध्यप्रदेश , महाराष्ट्र सह संपुर्ण जिल्ह्यात व तालुक्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरण ९६% टक्के भरल्याने बुधवारी सकाळ पासून धरणाचे १६ दरवाजे उघडुन ०.५ फूट अतिरिक्त पाणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने पेंच व कन्हान नदी ला पूर आला असुन सुवर्णधारा , नरहर , बाणेरा , कोलितमारा , टोली , आमगाव , वरडा , जुनी कामठी गाडेघाट , कुंवरा भिवसेन, नयाकुंड , बाखरी , करंभाड , दहेगाव जोशी , सोनेगाव , बिटोली , पिपळा , गरांडा , घोघरा देवस्थान या गावात पुराचे पाणी पुराचे घुसल्याने संपर्क तुटला असुन नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे नदी काठावरील गावांना व नागरिकांना दवंडी द्वारे सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे . अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .

नवेगाव खैरी पेंच धरण परिसरात मंगळवार ला रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी धरणाची पाणी पातळी ९८ टक्के इतकी झाल्याने सकाळी ९ वाजता पेंच व कन्हान नदीत ०.३ मीटर ५०६.८४ क्युसेस पाणी सोडण्यात आले.

तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच व कन्हान नदीच्या काठावर वसलेल्या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल बेहाल झाले असुन मंगळवार पर्यंत तालुक्यात एकूण ४९९.६७५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे . या मध्ये तालुक्याचा आमडी विभागात सर्वाधिक ६६.९ (५८१.८ मिमी) , पारशिवनी विभागात 104.0 (536.3 मिमी) , नवेगाव खैरी येथे 145.0 ( 501.1 मिमी ) , कन्हान येथे 83.0 ( 379.2 मिमी ) पाऊस झाला . अश्या पारशिवनी तालुक्यात चार ही विभागात सरासरी ९९.७ (४९९.६७५) मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे .नवेगाव खैरी पेंच धरणातील पाणीपातळी कमी न झाल्याने बुधवार ला दुपारी १२ वाजता पासुन ०.५ मीटर ने दरवाजे वर करून ८५६.८० क्युसेस पाण्याचा विसर्ग रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होता. रात्री ८ नंतर एक फिट पाणी सोडले जात असुन धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे .

अश्या परिस्थिति मध्ये कोणतीही भीती न बाळगता दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे . पेंच नदीवरील घोगरा महादेव पर्यटनस्थळ आणि पेंच नदीतील पारशिवनी जवळील कुंवरा भिवसेन देवस्थान , घोगरा महादेव तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ पेंच जलाशय पुरामुळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत . अशी माहिती अधिकार्यांनी दिली.

पुरांमुळे झालेल्या परिस्थिति वर पारशिवनी पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे , कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , गटविकास अधिकारी अशोक जाधव , मंडळ अधिकारी , पटवारी , कोतवाल , पोलीस पाटील आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष ठेवून आहेत .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …