Breaking News

*अवैध कँसीनो सेंटर च्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात*

*अवैध कँसीनो सेंटर च्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात*


*ठाणेदारांना नीवेदन करुण कँसीनो सेंटर परत सुरू होऊ नये अन्यथा आंदोलनात्मक पाऊल उचलण्याचा इशारा*


*तक्रारकर्ते इरशाद शाह ला पोलिस संरक्षण देण्याची मागणी*

*मुख्य संपादक- किशोर ढुंढेले व्दारा*

*सावनेर:शहरात जोमाने पाय पसरवत असलेल्या अवैध कँसीनो सेंटर व्यवसाय व त्यामुळे उध्वस्त होत असलेली युवक विद्यार्थी व गोरगरीब परिवार याची दखल घेत सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस चे अध्यक्ष राजैश खंगारे व महासचिव इमरान शाह यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांना निवेदन सादर करुण शहरातील बंद पडलेला कँसीनो व्यवसाय परत सुरू होऊ नये याचा कायमचा पायबंद व्हावा तसेच तक्रारकत्यास कँसीनो संचलका कडून मीळत असलेल्या जीवघेण्या धमकी वर योग्य कठोर कारवाई व त्यास पोलिस संरक्षण करण्याची मागणी सदर निवेदनातुन करण्यात आली आहे*
*सावनेर शहरात फोफावत असलेल्या अवैध कँसीनो व्यवसायाच्या विरोधात महाराष्ट्र न्यूज मीडिया नी प्रखरतेने बातम्या प्रकाशित केल्याने अवैध व्यवसाईकांचे धाबे दनानले होते व सदर बातमीची दखल घेत स्थानिक पोलीस प्रशासन हरकतीत येऊण कारवाई ला सुरुवात करण्यात आल्यामुळे सदर अवैध कँसीनो व्यवसाय सद्यास्थितीत बंद असुन सदर अवैध व्यवसायाच्या विरोधात आता तक्रारकर्ते सुध्दा पुढे येत असल्याने सदर अवैध कँसीनो संचालकाकडून अश्या तक्रारकर्त्यास त्यांचे घरी जाऊन धमकावन्याचे तसेच याना जीवे मारण्याच्या व त्याच्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणावर गांजा सारखे मादक पदार्थ ठेऊण फसविण्याच्या धमक्यां देत कसही करुण आपले अवैध व्यवसाय थाटन्याचा या दबंग संचालकांचा मानस दिसून येताच सदर विषयाला धरूण राष्ट्रीय युवक काँग्रेस व्दारे सावनेर पोलीस, पोलीस उपविभागीय अधिकारी,पोलीस अधिक्षक,तहसीलदार ,जिल्हाधिकारी व क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना निवेदन सादर करुण सदर अवैध कँसीनो व्यवसाय सावनेर शहरात भविष्यात परत कधीही सुरु होऊ नये अशी मागणी करत शहरात परत हा समाजास घातक असणारा व्यवसाय सुरू झाल्यास आंदोलनात्मक पाऊ उचलण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे *
*सावनेर कळमेश्वर विधानसभा यूवक काँग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे,महासचिव इमरान शाह, प्रवीण झाडे आदी वरिष्ठ कार्यकर्तेयांच्या नेतृत्वात विनीत पाटील,राहुल डोंगरे,प्रफुल सुपारे,आशीष लोधी,रूपेश कमाले,आदित्य इंगेवार,सुरज चाफेकर,योगेश ढोले,सौरभ झाडे,प्रविण सेवके,मोहन कमाले,रफीक शाह सह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …