Breaking News

*विनयभंग,आरोपीस अटक*

*विनयभंग,आरोपीस अटक*


सावनेर: फिर्यादी पिडीतेच्या दारावर जाऊन वहीणी-वहीणी म्हणून आवाज देत बाहेर बोलावले व आपला पॅन्ट सोडून अश्लिील हावभाव करित फिर्यादी पिडीतेचा विनयभंग केला. ही घटना मंगळवार दि.12 रोजी दुपारी 3 वा दरम्यान घडली. राहुल नामदेव लाडे,(28) वर्ष, रा. तेलकामठी असे आरोपिचे नांव असून त्यास अटक करण्यात आली आहे.

*मिळालेल्या माहितीनुसार दि. 12 जुलै रोजी 23 वर्षीय फिर्यादी पिडीते ची सासू व पती शेतीच्या कामाकरिता कळमेश्वर तहसिल मध्ये गेले असता आरोपी राहुल नामदेव लाडे, वय 28 वर्ष, रा. तेलकामठी हा किराणा दुकाणात खर्रा घेण्याकरीता आला होता. तो खर्रा घेवुन आपले घरी न जाता फिर्यादी ही राहत असलेल्या घरी बाजुच्या गल्लीतून आला दारापुढे येवुन फिर्यादीला वहीनी म्हणुन आवाज दिला, ती बाहेर आली असता त्याने आपली पॅन्ट सोडुन अश्लिल कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला. फिर्यादी ही ओरडल्यानंतर तो तेथुन पळुन गेला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 354 भादंवी.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.*

*आरोपीला अटक करण्यात आली असून पोनी मारुती मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार देवशंकर गुप्ता हे करीत आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …