*बांबुच्या काठीने डोक्यावर माराहण करुन केले जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपीचा शोध सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस पाच किमी अंतरावर असलेल्या बाधा दफई खदान नंबर सहा येथे एका आरोपी ने फिर्यादी यांचा मित्राच्या डोक्यावर बांबुच्या काठीने माराहण जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक ८ जुलाई ला रात्री ९ ते ९:३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी गुलशन भास्कर मेश्राम वय २३ वर्ष राहणार बाधा दफई खदान नंबर सहा हा आपल्या मित्र रोहीत सुर्यवंशी , अरुण कश्यप , शुभम कश्यप , यांच्या सोबत वस्ती मधील कश्यप यांच्या दुकान जवळ बसले असता तेव्हा तेथे वस्ती मध्ये आरोपी राकेश देविदिन सुर्यवंशी वय २३ वर्ष राहणार इंदर काॅलोनी खदान नंबर सहा हा गुलशन मेश्राम व त्यांच्या मित्रान जवळ येऊन उभा झाला असता गुलशन मेश्राम ह्याने त्याला बोलले की “तु आमच्या जवळ का उभा झाला तु इथुन निघुन जा” असे म्हटल्यावर आरोपी राकेश सुर्यवंशी ह्याने गुलशन मेश्राम ह्यांना शिवीगाळी देत म्हणाला की “तु कोण होता यहा से जाने के लिये बोलने वाला” असे म्हणून राकेश सुर्यवंशी हा मला हातबुक्याने मारु लागला तेव्हा गुलशन मेश्राम ह्याचे मित्र रोहित सूर्यवंशी , अरुण कश्यप , शुभम कश्यप ह्या तिघांनी गुलशन मेश्राम सोबत होणारे भांडण सोडविले तेव्हा राकेश सुर्यवंशी हा तिथुन आपल्या घरी निघुन गेला आणि काही वेळाने राकेश सुर्यवंशी हा आपल्या घरुन बांबुची काठी घेवुन गुलशन मेश्राम व त्यांच्या मित्रा कडे येत असता त्याला मधात रस्त्या मध्ये गुलशन मेश्राम यांचा मित्र शुभम कश्यप ह्याचा लहान भाऊ अंकुश कश्यप हा राकेश सुर्यवंशी याला भेटला असता त्याला वाटले की शुभम याने त्याच्या भावाला भांडणा बाबत सांगुन तेथे बोलावले असावे या कारणावरून राकेश सुर्यवंशी याने अंकुश कश्यप सोबत काहीही न बोलता गुलशन मेश्राम यांच्या समोर अंकुश च्या डोक्यावर त्याच्या जवळ असलेली बांबुची काठी मारली असता अंकुश कश्यप याच्या डोक्याला जबर मार लागुन तो खाली जमीनीवर पडला असता गुलशन मेश्राम व त्यांचा सोबत असलेले मित्र शुभम कश्यप , रोहित सुर्यवंशी , अरुण कश्यप हे अंकुश कश्यप ला वाचविण्याकरिता धावले असता राकेश सुर्यवंशी ह्याने गुलशन मेश्राम व त्यांच्या मित्रांना मारण्याकरिता काठी उचलली असता गुलशन मेश्राम व त्यांच्या मित्रांनी त्याला अडविले असता राकेश सुर्यवंशी ह्याने गुलशन मेश्राम व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन निघुन गेला नंतर गुलशन मेश्राम ह्याच्या मित्र शुभम कश्यप व त्याचा घरच्या लोकांनी अंकुश कश्यप ला उपचारा करिता कन्हान येथील खाजगी दवाखान्यात घेवुन गेले व गुलशन मेश्राम व त्याचे मित्र रोहित , अरुण हे पोलीस स्टेशन येथे आले असता कन्हान पोलीसांनी फिर्यादी गुलशन मेश्राम यांच्या तोंडी रिपोर्ट वरून आरोपी राकेश सुर्यवंशी विरुद्ध अपराध क्रमांक ४०७/२२ कलम ३२४ , ५०४ , ५०६ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज