Breaking News

*राधाकृष्ण नगर येथे अल्पवयीन मुली चा एका आरोपी ने केला विनयभंग* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपी अटक*

*राधाकृष्ण नगर येथे अल्पवयीन मुली चा एका आरोपी ने केला विनयभंग*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपी अटक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत राधाकृष्ण नगर येथे एका आरोपी ने अल्पवयीन मुली चा विनयभंग केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक ८ जुलाई ला दुपारी १:४५ ते १:५० वाजता च्या दरम्यान फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी/ पीडिता वय ९ वर्ष ही फिर्यादी यांच्या भासऱ्याचा घरी भासऱ्याचा मुलासह जेवन करीत असतांनी तेथे असलेल्या आरोपी नामे प्रकाश शंकररावजी पानतावने वय ३० वर्ष राहणार राधाकृष्ण नगर वार्ड क्रमांक २ हनुमान मंदिराच्या समोर कन्हान हा येऊन वाईट उद्देशाने पीडित मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला . त्या दरम्यान तो पळुन जात असतांना फिर्यादी ने त्याला हटकले असता आरोपी प्रकाश शंकररावजी पानतावने ह्याने फिर्यादी ला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन पळुन गेला .
सदर प्रकरणा बाबत फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे कन्हान येथे आरोपी विरुद्ध कलम ४५२ , ३५४ , (अ) , ३२३ , ५०४ भांदवि सहकलम ३(१)(w)(i)३(ii)(२)(va) अनुसूचित जाति/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ , सहकलम ४ , ८ , १० , १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी प्रकाश शंकररावजी पानतावने याला अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान विभाग कन्हान चे उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान हे करीत आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …