सावनेर के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

*डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली*

सावनेर प्रतिनिधि -सुरज सेलकर

सावनेरस्थानिक के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यानी प्रतिमेसमोर सामुहीकरित्या श्रद्धांजली अर्पन करूण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच या दिना निमित् ” उच्च शिक्षणासमोरील आव्हाने ” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला परिक्षक म्हणून स्थानिक के.डी.पवार बि.पी.एड. महाविद्यालयाच्या चौधरी मॅडम उपस्थित होत्या. कार्यकमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ .एस ए.घोडेस्वार,प्रमुख अतिथी म्हणून डाॅ .भाविका जैन मॅडम,उपस्थित होत्या. तसेच जे . हीरास मॅडम, माडेकर मॅडम, चौधरीमॅडम, बावणकर सर , देशमुख सर, फलके सर , लोणारे सर आदींची उपस्थिती होती.कार्यकमाचे संचालन रोहीणी बुरहान हीने केले तर आभार स्वाती चव्हान हिने मानले.राष्टृगिताने कार्यकमाची सांगता झाली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …