*कन्हान येथे लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रम थाटात संपन्न* *प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांका वर आलेल्या कलाकरांना केले सम्मानित*

*कन्हान येथे लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रम थाटात संपन्न*

*प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांका वर आलेल्या कलाकरांना केले सम्मानित*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे राजकुमारजी मागास्वर्गीय बहु‌द्देशीय संस्था द्वारे कुलदीप मंगल कार्यालय मध्ये लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे उद्घाटन के एस एस अध्यक्ष , जेबीसीसीआई सदस्य , भारत सरकार श्रम मंत्रालय चे शिवकुमार यादव , कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद डोणेकर , अमोल कळंबे , सह आदि मान्यवरांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . या लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रमात अनेक कलाकरांना सहभाग घेतला होता . या स्पर्धेत प्रथम पुरस्कार डिंपल भैंस यांना देऊन सम्मानित करण्यात आले असुन द्वितीय पुरस्कार सायली कांबळे यांना देऊन सम्मानित करण्यात आले आणि तृतीय पुरस्कार आराध्या संजु गिते यांना देऊन सम्मानित करण्यात आले .


कार्यक्रमात प्रमुख अतिथि दिव्याणी पोहकर , रामकुमार आहोके , नेहा मेहता , गिरीष पोहेकर आदि उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजकुमाजी मागास्वर्गीय बहु‌द्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष रत्नमाला डोंगरे , सचिव अंतकला भोवते , सह सचिव राजकुमारजी गजभिए , कोषाध्यक्ष दिक्षा पाटील , सदस्य खुशाल गजभिए , राजु डोंगरे ,माधुरी गजभिए , सीमा गजभिए , प्रतिभा मेश्राम , दादाराव मेश्राम , वृषभ गजभिए , अभिषेक गजभिए सह आदि पदाधिकर्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …