Breaking News

*टेकाडी येथे अवैध कोळसा टाल वर धाड* *वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीस यांची संयुक्त कारवाई , एकुण ४६८० रूपयाच कोळसा जप्त*

*टेकाडी येथे अवैध कोळसा टाल वर धाड*

*वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीस यांची संयुक्त कारवाई , एकुण ४६८० रूपयाच कोळसा जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत महाजन नगर टेकाडी येथे चार आरोपीतांनी संगमत करून अवैध कोळसा टाल सुरू करून वेकोलि चा कोळसा चोरी करून ढीग जमा करित असल्याची वेकोलि सुरक्षा अधिकारी यांना गुप्त माहिती मिळाल्याने वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीस यांनी संयुक्त कारवाई करीत टेकाडी येथे अवैध कोळसा टालवर धाड मारली असता एकुण ११७० किलो किंमत ४६८० रुपयाचा कोळसा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे वय ४४ वर्ष हे शुक्रवार (दि.१५) जुलै ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान पेट्रोलिंग करित असतांना गुप्त बातमी दारा कडुन माहिती मिळाली की, महाजन नगर टेकाडी येथे अवैध कोळसा टालवर वेकोलि चा कोळसा चोरून साठा जमा करित आहे. तेव्हा वेकोलि सुरक्षा अधिकारी व कन्हान पोलीसांनी संयुक्त रित्या महाजन नगर टेकाडी येथे जावुन धाड मारली असता तेथे चोरीचा कोळसाचा अवैध साठा मिळुन आल्याने रविकांत कंडे व इतरांनी गोपनीय माहिती काढुन सदर दगडी कोळसा हा आरोपी १) बिट्टु ऊर्फ नितेश रमेश भुते राह. वार्ड क्र.४ महाजन नगर टेकाडी, २) चिंटु सिंग, ३) फारूक अब्दुल्ला शेख दोघेही राह. कांद्री कन्हान यांनी चोरून विकणे करिता कोळसाचा साठा जमा करून ठेवला होता. तो लेबर च्या मदतीने पीक अप मध्ये भरून वजन केले असता ११७० किलो वजन असुन प्रति किलो ४ रुपये प्रमाणे ४६८० रुपयांचा दगडी कोळसा जप्त करून वेकोलि खुली खदान डेपो इंदर काॅलरी येथे जमा केला. सदर प्रकणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी रविकांत कंडे यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी १) बिट्टु ऊर्फ नितेश रमेश भुते, २) चिंटु सिंग, ३) फारुक अब्दुल्ला शेख यांचा विरुद्ध कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …