*बिएलओ च्या मानधनाचा प्रश्न गंभीर*
*महीलांचे तहसीलदारांना निवेदन*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
मोवाड – सलग चार वर्षापासुन केंद्रस्तरीय
मतदार नोंदणी अधीकारी (बिएलओ ) चे मानधन मिळाले नसल्याने अनेकदा यासंदर्भात निवेदनही देण्यात आली असुन आता हा प्रश्न अत्यंत गंभीर व जिकरीचा समजुन महीला बिएलओंनी मानधन मागणीसाठी शासनाकडे तगादा लावला आहे. त्यासंदर्भातील निवेदन पुन्हा नरखेडचे तहसीलदार डि. बि. जाधव यांचेकडे नुकतेच देण्यात आले आहे. अगदी
तुटपुंज्या मानधनावर वर्षभर निवडणुक विभागाची कामे करून आषेवर जिवन जगणार्या महीलांवर आता शासनाकडे पदर
पसरविण्याची वेळ आली आहे. नवीन मतदार
नोंदणी करणे, मतदारांच्या घरोघरी जाऊन यादी तपासणी करणे, वेळोवेळी निवडणुक विभागाच्या मिटींगला स्वखर्चाने ऊपस्थीत राहणे, भरण्यात आलेले सर्व फाॅर्म स्वखर्चाने
तालुक्याला पोहचते करणे, महत्वाची कामे सोडुन मतदार पुनर्निरीक्षण मोहीमेला आपल्या
बुथवर दीवसभर ऊपस्थीत राहणे, कुणाच्या तरी मोबाईलवर त्याची फोटो काढुन ठरउन दीलेल्या गृपवर पाठवत राहणे आदी तसेच निवडणुक विभागाचे याहीपेक्षा मोठमोठे व कठीण कार्य या महीला बिएलओ कडुन करण्यात येत असते. आज ना ऊद्या पैसे मिळेल या आशेवर या महीला जगत आहेत, मात्र एक नव्हे दोन नव्हे सलग चार वर्षापासुन
मानधन मिळाले नसल्याने आता यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. आधीच कोरोना लाॅकडाऊन पासुन सर्वत्र बेरोजगारी, बेकारी व
महागाईने कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांचे जिवन जगणे कठीण झाले आहे. शेतीवाडी, शिक्षण तसेच आता ऊदरनिर्वाह करणेसाठी मोठा आटापीटा करावा लागत असुन त्यातही मोठी कसरत करावी लागत असल्याचे महीलांनी कळवीले. निवडणुक विभागाचे निम्यापेक्षा जास्त व कठीण कामे आंम्हालाच
करावे लागत असते, तरी असा
अन्याय का ?
असेही महीलांचे म्हणणे आहे. शासनाने महीला
बिएलओच्या रखडलेल्या मानधनाचा हा गंभीर प्रश्न तात्काळ सोडवावा व नियमीत वाढीव मानधन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी नरखेड येथील केंद्रस्तर मतदार नोंदणी अधीकारी करूणा मानकर, सोनाली पातोडे, माधुरी पकडे, गीता अंतुरकर, वेशाली मानकर, सोनाली मानकर, वंदना नेहारे, सुनंदा भागवतकर, वनीता मानकर, शोभा बारमासे, जोत्स्ना धांडे, प्रतीभा सलामे, मिना खंडाते, शिला ढोके, रेखा श्रिरामे, शिला निकोसे, मिना सातपुते, मिरा वैद्य तसेच अनुसया बारमाटे यांनी निवेदनाद्वारे कळवीले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज