*कृपासागर भोवते सरांचा सेवानिवृत्तपर सत्कार*
*भोवते सरांनी ५ वी च्या विद्यार्थ्याना संविधान पुस्तिका देऊन सामाजिक कार्याची सुरूवात*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – अखिलेश हायस्कुल साटक येथे २७ वर्ष ७ दिवस सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने संस्था व हायस्कुल व्दारे श्री कृपासागर शामराव भोवते सरांचा समारंभासह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त झाल्याने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्याना संविधान पुस्तिका देण्याचे ठरवुन भोवते सरांनी सामाजिक कार्याची सुरूवात केली.
दिनांक ३० जुन २०२२ ला अखिलेश हायस्कुल साटक येथे २७ वर्ष ७ दिवस शिक्षक म्हणुन सेवाप्रदान करून सेवानिवृत्त झालेले कृपासागर शामराव भोवते सरांचा नुकताच अखिलेश हायस्कुल साटक व्दारे संस्थेचे संस्थापक सचिव मा.जयदासजी सोमकुवर साहेब यांचे हस्ते व संस्था अध्यक्षा श्रीमती सोमकुवर मॅडम, संस्था सहसचिव अखिलेश सोमकुवर यांच्या प्रमुख उपस्थित समारंभासह श्री भोवते सरांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भोवते सरांनी सेवानिवृत्ती नंतर च्या काळात राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्रात कार्य करण्याचे ठरविले असुन त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासा शिवाय पर्याय नसल्याचे मार्गदर्शनात सांगितले. त्यानंतर इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना संविधान पुस्तिका देण्याचे ठरवुन सामाजिक कार्याची सुरूवात केली. कार्यक्रमास अखिलेश हायस्कुल साटक चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.