*वराडा शिवारात बारा चाकी ट्रक ची दुचाकी ला धडक , दुचाकी चालकाचा मृत्यु , तर मागे स्वार गंभीर जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*वराडा शिवारात बारा चाकी ट्रक ची दुचाकी ला धडक , दुचाकी चालकाचा मृत्यु , तर मागे स्वार गंभीर जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरातील वराडा शिवारात बारा चाकी ट्रक ची डाव्या बाजुला दुचाकी ला ज़ोरदार धडक लागल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यु झाला असुन मागे स्वार गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार ला सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान भुषण पुरूषोत्तम बावणे व पवन लक्ष्मणराव ढोरे हे दोघे ही पेंटर असुन शहापुर ला पेंटीगचे काम करून मनसर वरून नागपुर कडे दुचाकी युनिकॉन वाहन क्रमांक एम एच – ३१ एफ के १८९९ ने डबलसिट येत असताना बंद टोल नाका वराडा शिवारातील राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वर बारा चाकी ट्रक क्रमांक एपी – १६ – टी एफ – ९५४९ च्या बारा चाकी ट्रक चालकाने आपले वाहण यु टर्न घेत असतांना भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन दुचाकी ला डाव्या बाजुला धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक पवन ढोरे व भुषण बावने हे दोघेही रोडावर खाली पडुन गंभीर जख्मी झाल्याने पवन ढोरे याला मेयो रुग्णालय येथे उपचारा करिता भर्ती केले असता उपचारा दरम्यान पवन ढोरे याचा मुत्यु झाला असुन भुषण बावने याचा उपचार मेडीकल नागपुर येथे सुरु आहे .


सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी भुषण बावने यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध कलम २७९ , ३३८ , ३०४ अ , भांदवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे व विरेंद्र चौधरी हे करीत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …