*पारशिवनी तालुक्यात झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची भाजपा महामंत्री व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहणी*
*उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आढावा बैठक घेऊन अधिकार्यांना तात्काळ पंचनामे करुन मोबदला मिळुन देण्याचे दिले आदेश*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे आमगाव , बाबुलवाडा , सह अनेक गावात व शेतात पाणी शिरल्याने नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
सोमवार ला भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे महामंत्री व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी पारशिवनी तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाचा दौरा करुन अनेक गावात भेट देत प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली . त्यानंतर उपविभागीय अधिकारी वंदना सावरंगपते यांच्या कार्यालयात जाऊन संपुर्ण परिस्थिति बाबत आढावा बैठक घेऊन अधिकार्यांना तात्काळ पंचनामे करुन मोबदला मिळुन देण्याचे आदेश दिले .

या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी , भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ राजीव पोतदार , पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , जिल्हा परिषद सदस्य व विरोधी गट नेता व्यंकटेश कारेमोरे , राहुल किरपान , रामभाऊ दिवटे , सागर सायरे , मनोज गिरी , प्रतिक वैद्य , सौरभ पोटभरे सह आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज