*सेजल ज्युस सेंटर च्या बाजुला असलेल्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी एकुण २८,००० हजार रुपयांची केली चोरी* *फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपीचा शोध सुरु*

*सेजल ज्युस सेंटर च्या बाजुला असलेल्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी एकुण २८,००० हजार रुपयांची केली चोरी*

*फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपीचा शोध सुरु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील सेजल ज्युस सेंटर च्या बाजुला स्वामी विवेकानंद नगर येथे फिर्यादी यांच्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व नकदी रक्कम सहित एकुण २८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक १६ जुलाई ला सकाळी १०:०० वाजता च्या दरम्यान फिर्यादी गं.भा. प्रतिभा महेंद्र चौरे वय ४९ वर्ष राहणार सेजल ज्युस सेंटर चे बाजुला स्वामी विवेकानंद नगर कन्हान ही आपल्या घराला कुलुप लावुन सेवाग्राम वर्धा येथे वास्तुक च्या कार्यक्रमाला गेली होती . तसेच प्रतिभा चौरे यांचा घराचे समोरील रुम किरायाने दिल्याने त्यांचा कडे नळाचे पाणी येते म्हणून समोरील गेट ची चाबी किरायदार यांचा कडे दिली .


मंगळवार दिनांक १९ ला प्रतिभा चौरे यांना त्यांचे किरायदार रहीम शेख यांनी फोन करुन सांगितले कि ” तुमचा घराचा दरवाजा खुला दिसत आहे , तुम्ही आले आहात का , तेव्हा प्रतिभा चौरे यांनी किरायदारांना सांगितले कि ” मी वर्धा येथेच आहे . तुम्ही आत जाऊन पाहा तेव्हा हाॅलच्या रुम ला लावलेला लाॅक तो सुद्धा किरायदारांना तुटलेला दिसला असुन लोखंडी आलमारी खुली दिसली . असे किरायदाराने प्रतिभा चौरे यांना सांगितल्याने प्रतिभा चौरे ही वर्धा वरुन घरी आली व लोखंडी आलमारीची पाहणी केली असता लाॅकर मध्ये एका पर्स मध्ये ठेवलेले सोन्याची अंगुठी ०५ ग्राॅम , सोन्याचे लाॅकेट २.३४० मीली ग्राॅम , ०१ सोन्याची मणी असे एकुण २०,००० रुपए तसेच लाॅकर मध्ये स्टील च्या डब्यात ठेवलेले ८,००० रुपए दिसुन आले नाही . शनिवार दिनांक १६ जुलाई ला सकाळी १० ते मंगळवार दिनांक १९ ला दुपारी १२:३० वाजता पर्यंत च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी प्रतिभा चौरे यांचा घराचे समोरील लाॅक तोडुन आत प्रवेश करुन लोखंडी आलमारीतील नगदी रुपए व सोन्याचे दागिने असा एकुण २८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी गं.भा.प्रतिभा चौरे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ४२८/२२ कलम ४५४ , ४५७ , ३६० भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …