*युनियन बॅंक कांद्री येथुन अज्ञात आरोपी ने १,२०,५२१ रुपए काढुन केली फसवणुक* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*युनियन बॅंक कांद्री येथुन अज्ञात आरोपी ने १,२०,५२१ रुपए काढुन केली फसवणुक*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पाच किमी अंतरावरील युनियन बॅंक कांद्री कन्हान येथे एका अज्ञात आरोपी ने फिर्यादी यांच्या पत्त्नी च्या खात्यातुन १,२०,५२१ रुपए काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक २ जुलाई ते गुरुवार दिनांक १४ जुलाई ला दुपारी १२:०० ते १२:३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी नामे राजेंद्र बालाजी वानखेडे वय ५६ वर्ष राहणार धर्मराज शाळा समोर वार्ड क्रमांक ७ कांद्री कन्हान यांची पत्नी हि युनियन बॅंक कांद्री कन्हान मध्ये गेली . तेव्हा तिला समजले कि अज्ञात आरोपी ने तिचे व तिच्या पत्नीच्या खात्यातुन Amazon Paytm google या एप्स द्वारे एकुण १,२०,५२१ रुपए काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी राजेंद्र बालाजी वानखेडे यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४२० भांदवि सहकलम ६६(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …