*पंचर काढण्याचा दुकानातुन ८ नग लोखंडी डिक्स चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दहा किमी अंतरावर असलेल्या गोंडेगाव येथील फिर्यादी यांच्या पंचर च्या दुकानातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने एकुण ८ नग लोखंडी डिक्स किंमत ८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी शेख सुभ्राती पिरबक्ष वय ५३ वर्ष राहणार गोंडेगाव काॅलोनी कन्हान यांची पंचर ची दुकान २२ वर्षा पासुन गोंडेगाव खदान येथे असुन ते दररोज सकाळी ८:०० वाजता दुकान उघडुन रात्री ८:०० वाजता बंद करुन घरी जातात . शेख सुभ्राती पिरबक्ष यांनी बुधवार दिनांक २० जुलै ला सकाळी ८:०० वाजता दुकन उघडली आणि पंचर चे कार्य पुर्ण करुन रात्री ८:०० वाजता बंद करुन घरी निघुन गेले . दुसऱ्या दिवशी गुरवार दिनांक २१ जुलै ला शेख सुभ्राती पिरबक्ष हे आपले दुकान उघडण्याकरीता आले असता त्यांना दुकानात ठेवलेले ८ लोखंडी डिक्स दिसुन न आल्याने आजु बाजुच्या परिसरात शोध व विचारफुस केली असता लोखंडी डिक्स मिळुन न आल्याने कोणीतरी अज्ञात चोराने एकुण ८ नग लोखंडी डिक्स किंमत ८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी शेख सुभ्राती पिरबक्ष यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४६१ , ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक मंगेश सोनटक्के हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .