*फोर्ड वाहन कार चालकाची बस ला मागुन जोरदार धडक , कार चालक जख्मी*
*बस चे २०,००० रुपयाचे नुकसान*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दशिणेस १०० किमी अंतरावर असलेल्या बीकेसीपी शाळेसमोरील रेल्वे गेट जवळ आरोपी फोर्ड वाहन कार चालक ने बस ला मागुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार चालक स्वता जख्मी होऊन बस चे २०,००० रुपयाचे नुकसान केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी विलास दौलत डोंगरे वय ३८ राहणार वाठोडा , नागपुर हे बस मालक नंदु वाघमारे यांची फोर्ड गाडी क्रमांक एम एच ४९ एटी ८८१६ हे दीड वर्षापासुन चालवित आहे . सोमवार दिनांक ११ जुलाई ला रामटेक येथे रिसेप्शन जाणे व येण्याची बुकिंग होती . विलास दौलत हे रामटेक येथे मिनि बस घेऊन गेले व रात्री १०:३० वाजता च्या दरम्यान विलास दौलत हे मिनि बस क्रमांक एम एच ४९ एटी ८८१६ नी कन्हान येथे रेल्वे गेट वर आले असता रेल्वे गेट बंद असल्याने विलास दौलत यांनी बस उभी केली असता तेवढ्यात मागुन येणारी फोर्ड गाडी क्रमांक एम एच ४३/ ए एल/ ८६४७ च्या चालक आरोपी नामे प्रदुमन्य नरेंद्र बोरकर ह्याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन विलास दौलत यांच्या मिनि बस ला मागुन जोरदार धडक दिल्याने विलास दौलत यांच्या मिनि बस चे मागचे डिक्कीचे २०,००० रुपयाचे नुकसान झाले व सदर फोर्ड गाडी चा चालक आरोपी नामे प्रदुमन्य नरेंद्र बोरकर हा स्वता जख्मी होणेस कारणीभुत झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी विलास दौलत यांच्या तोंडी रिपोर्ट वरून आरोपी
फोर्ड गाडी चा चालक प्रदुमन्य नरेंद्र बोरकर ह्यांचा विरुद्ध कलम २७९ , ३३७ , ४२७ , भांदवि सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .