Breaking News

*साटक येथे तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे वृक्षरोपण करून जनजागृती केली* *साटक ग्रामपंचायत व अखिलेश हायस्कुल चा सक्रिय सहभाग*

*साटक येथे तपस्या फाऊंडेशन रामटेक व्दारे वृक्षरोपण करून जनजागृती केली*

*साटक ग्रामपंचायत व अखिलेश हायस्कुल चा सक्रिय सहभाग*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – तपस्या फाऊंडेशन रामटेक व साटक ग्रामपंचायत यांच्या सयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र,अखिलेश हाइस्कुल, ग्राम पंचायत परिसर व सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात वृक्षारोपण करून जनजागृती करण्यात आली.


शनिवार (दि.२३) जुलै ला तपस्या फाऊंडेशन रामटेक व साटक ग्राम पंचायत यांच्या सयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत परिसर, सिद्ध हनुमानजी मंदिर साटक च्या मैदानात सरपंचा सौ सीमाताई यशवंतराव उकुंडे, तपस्या फाऊंडेशन रामटेक च्या अध्यक्षा सौ सरिता बीरो, उपसरपंच गजानन वांढरे , मुरलीधर वाडीभस्मे , कृष्णाजी देशमुख , चिंटु वाकुडकर आणि ग्रामस्थाच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र , अखिलेश हाइस्कुल साटक येथे शालेय विद्यार्थी , शिक्षक प्रदीप निरे , कैलाश हुमने सर , अनमोल मेश्राम सर , जेष्ट नागरिक टेकचंद हिंगणकर , गोविंदा बर्वे , आशीष देशमुख यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी तपस्या फाऊंडेशन चे सरंक्षक कैलाश बीरो यांनी जास्तीत जास्त वृक्ष लावुन पर्यावरणाची जोपासना करित आपले गाव स्वच्छ, सुंदर, निरोगी बनविण्याचे ग्रामस्थाना आवाहन केले. या प्रसंगी नारायणजी कुंबलकर , रमाकांत मुरमुरे , तरूण बर्वे , प्रमोद मोहनकर , अंकित देशमुख , अक्षय आकरे , अरूण लोढे , निकेश हारोडे , मनोज लक्षणे , जीतु हिंगणकर , श्री बेनीराम बीरो सह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री खुबलाल यादव यांनी तर आभार फोटो ग्राफर रामटेकचे श्री आकाश तिवाडे हयानी केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …