Breaking News

*एपीजे अब्दुल कलाम स्मृती दिवस संपन्न*

*एपीजे अब्दुल कलाम स्मृती दिवस संपन्न*

सावनेरः अरविंद इंन्डो पब्लिक स्कूल मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिवस साजरा.
नागपूर/सावनेर- स्थानिक अरविंद इंन्डो पब्लिक स्कूल (हेटी) सावनेर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृति दिवस साजरा करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारताचे ‘मिसाइल मॅन’ आणि भारतीय जनतेचे सर्वात लोकप्रिय असलेले राष्ट्रपती या नावाने ओळखले जातात. हे भारताचे 11 वे राष्ट्रपती होते. त्यांनी शिकवले जीवनात परिस्थिती काय असू शकते याची पर्वा नाही परंतु जेव्हा आपण आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा दृढनिश्चय करतो, तेव्हा आपण ती पूर्ण करूनच जगतो. अब्दुल कलाम यांचे हे विचार अजूनही आपल्या पिढीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात.


डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे विद्यार्थीप्रिय होते व विद्यार्थ्यांना सुद्धा ते प्रिय व प्रेरणादायी होते. म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मृती दिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला शाळेचे प्राचार्य राजेंद्र मिश्रा सर यांनी माल्यार्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रफिती तयार केल्या तसेच चांगले सुविचार शाळेत प्रदर्शित केले.
अरविंद बाबू देशमुख प्रतिष्ठान कार्यकारी अध्यक्ष डाॅ. आशिष देशमुख सरांनी शाळेच्या उपक्रमाची प्रशंसा केली व विद्यार्थ्यांनचे कौतुक केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …