Breaking News

*शेतात काम करीत असतांना अंगावर विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा मुत्यु* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल* *शेतकरी दीपक महल्ले च्या कुंटुबास शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी – सरपंच धनराज हारोडे*

*शेतात काम करीत असतांना अंगावर विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा मुत्यु*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल*

*शेतकरी दीपक महल्ले च्या कुंटुबास शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी – सरपंच धनराज हारोडे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस १० किमी अंतरावर असलेल्या एसंबा (सालवा) येथे शेतातील बांधीत दोन इसम काम करतांना एका एक जोरदार पाऊस येण्या अगोदर जोराच्या कडाक्या सह शेतकरी दीपक महल्ले यांचा अंगावर विज पडुन घटनास्थळीच मुत्यु झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे .


शनिवार (दि.३०) जुलै ला दुपारी कन्हान परिसरात जोरदार विज गर्जेनेसह पाऊस आल्याने कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील एंसबा (सालवा) शेत शिवारात शेतकरी दिपक पाडुरंग महल्ले वय ५४ वर्ष राहणार एंसबा (सालवा) यांची ४ एकर शेती असुन शेतात धानाची लावण करण्याकरिता ट्रक्टरने चिखल करून बांध्यात जावई नेपाल मनोहर फुटाणे व दीपक महल्ले हे दोघेही बांध्यात काम करित होते. दुपारी १ वाजता दरम्यान एकाएक जोरदार विज गर्जेनेसह पाऊस येऊन शेतकरी दिपक महल्ले यांच्या अंगावर विज पडुन त्यांचे कपडे जळुन शरीर भाजुन घटनास्थळीच त्याचा मुत्यु झाला असुन बाजुच्या बांधीत काम करणारे जावाई नेपाल फुटाणे यांना अमोल महल्ले ला बोलावुन पाहीले तर दिपक महल्ले यांचे अंग जळुन मुत्यु झाल्याचे दिसले . सदर घटनेची माहिती संरपच धनराज हारोडे , योगीता सूर्यकांत काले मंडळ अधीकारी चाचेर , चंद्रकांत महाल्ले , मनोहर नागपुरे , गौरव महाल्ले , निखील फूटाने , यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचुन मृतक दिपक महल्ले यांना उचलुन वाहनाने कन्हान पोलीस स्टेशन ला कळवुन कामठी ग्रामिण उपजिल्हा रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरानी त्यांचा घटनास्ळीच मृत्यु झाल्याचे घोषित केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी पुतण्या अमोल सुधाकर महल्ले यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे ला मर्ग दाखल केला असता गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

 

*शेतकरी दीपक महल्ले च्या कुंटुबास शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी*

एंसबा (सालवा) येथील शेतीत शेतकरी दिपक महल्ले यांच्या अंगावर विज पडुन मुत्यु झाल्याने त्यांच्या परिवारातील पत्नी, दोन मुली, दोन मुले यांच्या दु:खाचा डोंगर कोसळुन शेतकऱ्यांचा परिवार हवालदिल होत आर्थिक संकटात सापडल्याने शासन, प्रशासनाने या कुंटुंबास तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी सरपंच धनराज हारोडे , ग्रामपंचायत सदस्य एंसबा व परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केली आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …