*वीज पडल्याने मृत्यु झालेल्या दीपक महल्ले यांचा कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत*

*वीज पडल्याने मृत्यु झालेल्या दीपक महल्ले यांचा कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – शहरा पासुन काही अंतरावर असलेल्या ऐसंबा शिवारातील (सालवा) शेतात बांधीत विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याने येथील सरपंच धनराज हारोडे व परिसरातील ग्रामस्थानी मृतकांच्या कुंटुबास तातडीने आर्थिक मदतीची मागणी केल्याने शासना व्दारे मौदा तहसीलदार च्या मार्फत शेतकरी दिपक महाल्ले यांच्या कुंटुबास चार लाख रूपयाचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली.
शनिवार (दि.३०) जुलै ला दुपारी मौदा तालुक्यातील ऐसंबा (सालवा) शेत शिवारात विज पडुन शेतकरी दिपक पाडुरंग महल्ले वय ५४ वर्ष राह. ऐसंबा (सा लवा) यांचा अंगावर विज पडुन घटनास्थळीच त्यांचा मुत्यु झाल्याने त्यांच्या परिवारातील पत्नी, दोन मुली, दोन मुले यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळुन शेतकऱ्यांचा परिवार हवालदिल होत आर्थिक संकटात सापडल्याने शासनाने या कुंटुंबास तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी एंसबा सरपंच धनराज हारोडे व परिसरातील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केली होती. शुक्रवार (दि. ५) ऑगस्ट ला येसंबा येथील शेतात विज पडुन मृत्यु पावलेले श्री.दिपक पांडुरंगजी महाल्ले यांच्या घरी जावुन त्यांच्या कुंटुबाला शासना व्दारे आर्थीक मदत म्हणुन मौदा तहसिलदार मा. मलिक विराणी यांच्या हस्ते चार लक्ष रूपयांचा धनादेश देऊन मदत करण्यात आली.
या वेळी मंडळ अधिकारी काळे मँडम , तलाठी घाटे मँडम , येसंबा सरपंच धनराज हारोडे सह मृतकाचे कुंटुबिय प्रामुख्याने उपस्थित होते. शासना मार्फत मा. मलिक विराणी तहसिलदार हयांनी तातडीने आर्थिक मदत मिळवुन दिल्याने ऐसंबा सरपंच धनराज हारोडे व कुंटुबियानी महाराष्ट्र शासन व तहसिलदारांचे आभार व्यकत केले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …