*बोर्डा टोल नाका जवळ ट्रकची कार ला धडक लागल्याने २०,००० रुपयाचे नुकसान*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किमी अंतरावर असलेल्या बोर्डा टोल नाका जवळ ट्रक चालक टोल नाक्यावर काना कापत असता अचानक इन्टीकेटर न देता मागे न पहता निष्काळजीपने आपल्या ताब्यातील ट्रक वाहन भरधाव वेगाने रिवर्स घेऊन मागे उभ्या असलेल्या फिर्यादी यांच्या कार ला धडक मारुन २०,००० रुपयाचे नुकसान केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी राजेश रत्नाकर मामीडवार वय ५२ वर्ष रा. तुळजा नगरी आर्मी रोड यवतमाळ हे श्रीराम चीट्स फायनान्स इंडीया लिमीटेड यवतमाळ डेव्हलपमेन्ट ऑफीसर या पदावर मागील 15 वर्षापासून काम करीत असुन नागपूरला हेड ऑफीस असल्यामुळे त्यांचे येणे जाने सतत होत असते .
शुक्रवार दि .५ आॅगस्ट ला राजेश मामीडवार यांचा कंपनीची फायनान्स बाबत पेन्द्र पारशिवनी येथे मिटिंग असल्यामुळे राजेश मामीडवार हे सकाळी ९:०० वाजता च्या दरम्यान हे यवतमाळ येथुन आपल्या स्वताच्या शेवरलेट कंपनीची युवा सेल कार क्र . एम एच – २९ – एडी ३८१६ या वाहनाने मिटिंग करीता सहकारी सोबत निघाले असता अंदाजे दुपारी १२:०० वाजता च्या दरम्यान राजेश मामीडवार हे
बोर्डा टोल नाका कन्हान येथे पोहचलो असता त्यांचा कार वाहना समोर ट्रक क्र . एम एच – ४० – सीडी – ३५१४ चे वाहन चालक टोल नाक्यावर काना कापत असता अचानक इन्टीकेटर न देता , मागे न पहता , निष्काळजीपने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने रिवर्स घेऊन राजेश मामीडवार यांचा कार वाहनाच्या समोरील बाजुस धडक दिली असता राजेश मामीडवार हे लगेच आपल्या वाहनातून बाहेर निघुन पाहिले असता त्यांचा वाहनाचे समोरील बंपर बॉनेट , उजव्या बाजुचे हेड लाईट तसेच ड्रायव्हर साईडच्या दरवाज्याचे असे मिळुन २०,००० रुपयाचे नुकसान झाल्याने कन्हान पोलीसांनी राजेश मामीडवार यांचा तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे ला
ट्रक क्र . एम एच – ४० – सीडी – ३५१४ चा चालक आरोपी नामे
असलम शौकत शेख वय ४५ वर्ष रा . मोहाडी तुमसर , भंडारा यांचा विरुद्ध अपराध क्रमांक ४७०/२२ कलम २७९ , ४२७ भांदवि सहकलम आर/डब्लू/५०/१७७ , १०४/ १७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .