*पारशिवनी येथे महंगाई दरवाढ विरोधात काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांचे धरणा प्रदर्शन* *शेतकर्यांचा व नागरिकांच्या विविध मागण्या तात्काळ पुर्ण करण्याची मागणी* *पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतिंना निवेदन*

*पारशिवनी येथे महंगाई दरवाढ विरोधात काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांचे धरणा प्रदर्शन*

*शेतकर्यांचा व नागरिकांच्या विविध मागण्या तात्काळ पुर्ण करण्याची मागणी*

*पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतिंना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – केंद्रातील मोदी सरकार ने पेट्रोल, डिझेल , घरगुती गॅस किमती सह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मध्ये प्रचंड वाढ केल्याने आम नागरिकांची कंबर मोडल्याने पारशिवनी तालुक्यात काॅंग्रेस आक्रमक झाली आहे .


शनिवार ला पारशिवनी येथे महंगाई व विविध मागण्यांचा मुद्द्यावर काँग्रेस पारशिवनी तालुका पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष दयाराम भोयर यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेत केंद्र शासन व प्रशासना च्या विरोधात गांधी चौक येथुन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करीत शासन विरोधात जोरदार निर्दशने करुन तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला . त्यानंतर तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवुन महंगाई , जीवनावश्यक वस्तु वर लावलेली जी एस टी , अग्निपथ योजना , तालुक्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत , या वर्षाचे पिक कर्ज माफ , खरडुन गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनिच्या दुरुस्ती करीता ठोस मदत सह विविध मागण्या तात्काळ पुर्ण करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी श्रीधरराव झाडे , डुमन चकोले , चेतन देशमुख , दिपक भोयर , विरेंद्र गजभिये , उमराव निर्बोणे , संदिप भलावी , गोपाल बुरडे , हेमराज दळणे , ओमप्रकाश काकडे , इंद्रपाल गोरले , दादाराव मोहनकर , संजय लांजेवार , सौ.मिनाताई येवले , रामाजी पातुरकर , दिवाकर काळे ,रविंद्र गुळधे , अमोल देशमुख , दौलत सुरकार , सोनबाजी धांडे , वामन सुरकार , रेवाजी भुजाळे , रामभाऊ ठाकरे , अनिकेत निंबोणे सह आदि काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …