*मूक बधिर शाळेत स्वतंत्रता दिवस उत्साहने केले साजरा*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर – मूक बधिर निवासी शाळेत ध्वजारोहण संपन्न स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.प्रशांतराव डवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाला शाळेचे वैद्यकीय मार्गदर्शक डॉ अमित चेडे ,मुख्याध्यापिका सौ सुवर्णा महाशब्दे,पालक प्रतिनिधी श्री अरविंद शंभेकर,अधीक्षक श्री राजू दलाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे सचिव श्री नारायण समर्थ व प्रशासकीय अधिकारी सौ मंगला समर्थ यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी,भगतसिंग,सावित्रीबाई फुले,संत गाडगे बाबा यांची वेशभूषा साकारली व विविध रांगोळ्या काढून स्वातंत्र्य दिन साजरा केला.कार्यक्रमाचे संचालन श्री संजय लुंगे यांनी केले तर श्री सुनील राठोड यांनी आभाप्रदर्शन केले.कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते.