*जीवन विकास फाउंडेशन द्वारा स्तुतीजन्य उपक्रम एक हात मदतीचा* *साखरी येथे पेन रजिस्टर चे करण्यात आले वाटप*

*जीवन विकास फाउंडेशन द्वारा स्तुतीजन्य उपक्रम एक हात मदतीचा*

*साखरी येथे पेन रजिस्टर चे करण्यात आले वाटप*

सुर्ज़ी –  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला . याच श्रुंखलेत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील साखरी या गावी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, बालवाडी, अंगणवाडी येथे सरपंच नुरीताई भोसले तसेच पारडे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,त्यानंतर सर्व उपस्थिताच्या वतीने यावेळी राष्ट्रध्वज तिरंग्याला सामूहिक सलामी देण्यात आली. राष्ट्रगानाच्या प्रसंगी जवळ जवळपास सर्वच गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

15 ऑगस्ट ७५वा अमृत महोत्सवाचे अवचित्य साधून जीवन विकास फाउंडेशन चे संस्थापक,अध्यक्ष राजेंद्र वाटाणे यांच्या हस्ते सामाजिक कार्याचा वसा जपत सर्व विद्यार्थी,शिक्षक शिक्षिका यांना पेण ,रजिस्टर चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी गावातील मान्यवर प्रभाकर गायकवाड ,डॉ. दिलीप नवरंगे, वासुदेव डांगे, नरेश पंडित,सुनील शिरसाट, राजाभाऊ धंदर ,मधुकर गायगोले, जनार्दन नवरंगे, सुनील पंडित, त्रिंबक चराटे, अनिल डवले, संजय गायकवाड, मंगेश नाटक किशोर नवरंगे ,रतन शिरसाट ,अवधूत शिरसाट, वैभव इंगोले शिक्षक,शिक्षिका वृंद ,आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,मदतनीस विद्यार्थी आदी गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आनंद उत्साहात साजरा करण्यात आला.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …