*कन्हान ला 75 व्या स्वातंत्र्य दिनी महापुरुषांना केले अभिवादन* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला 75 व्या स्वातंत्र्य दिनी महापुरुषांना केले अभिवादन*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे 75 व्या स्वातंत्र्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे व मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांच्या हस्ते महात्मा गांधी , माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री , सरदार वल्लभभाई पटेल , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मंच मार्गदर्शक भरत सावळे यांनी स्वातंत्र्य दिवस वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत 75 वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , अनुराग महल्ले , भरत सावळे , प्रभाकर रुंघे , आकाश पंडितकर , शाहरुख खान , कृणाल राजपुत , संजय तिवसकर सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …