Breaking News

*कन्हान नदीत बुडून महीलेचा मु्त्यू*

*कन्हान नदीत बुडून महीलेचा मु्त्यू*


सावनेरः तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन हद्दीतील वाकी येथे घडली दुर्दैवी घटना*
*नागपूर येथून बाबा ताजुद्दीन यांच्या दर्शन घेण्याकरता आले होते दर्शन घेतल्यानंतर ते जवळ असलेल्या कन्हान नदीमध्ये पोहण्याकरता गेले होते त्यादरम्यान एका महिलेचा डोहामध्ये जाऊन मृत्यू झाला .*
*प्राप्त माहितीनुसार नागपूर येथील जयश्री धर्मेंद्र सोनटक्के राहणार नागपूर वय 45 व ऑटो चालक मदन काळे या दोघांनी वाकी येथील देव दर्शन घेतल्यानंतर जवळ असलेल्या कन्हान नदीवर दोघेही पोहण्याकरता गेले होते तेथे गेल्यावर ते एका दगडावर उभे राहून जयश्रींनी मी आंघोळ करीत आहे तू तिकडे उभा रहा असे सांगून जयश्री पाण्यात उतरली पाणी जास्त असल्यामुळे ती बुडतच गेली आणि ऑटो चालकाला पोहने येत नसल्यामुळे तोओरडू लागला परंतु तिला वाचू शकला नाही ही घटना आज शनिवारला दोन वाजताच्या दरम्यान घडली या घटनेची माहिती खापा ठाणेदार अजय मानकर यांना करतात ते ताबडतोब वाकीला जाऊन शोध घेत आहे मृत्यू महिला जयश्री हिचा शोध अजून पर्यंत लागलेला नाही पुढील तपास ठाणेदार अजय मानकर करीत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …