*येसंबा ग्रामपंचायत येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७८ वी जयंती साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरातील येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची ७८ वी जयंती साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांनी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्याअर्पण करुन विनम्र अभिवादन केले . त्यानंतर सरपंच धनराज हारोडे यांनी उपस्थितांना राजीव गांधी यांच्या जीवना विषयी मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी गामा चकोले , गणेश बांगडे , अक्षय विंदाणे , ग्रामप़चायत कर्मचारी संजय गजभिये सह गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज