Breaking News

*कन्हान येथे गणेशोत्सव निमित्य शांतता समितीची बैठक संपन्न* *पर्यावरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव शांततेने उत्साहात साजरा करण्यास प्रशासना ला सहकार्य करा. – मा वंदना सवंरगपते*

*कन्हान येथे गणेशोत्सव निमित्य शांतता समितीची बैठक संपन्न*

*पर्यावरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव शांततेने उत्साहात साजरा करण्यास प्रशासना ला सहकार्य करा. – मा वंदना सवंरगपते*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – शहर व ग्रामिण भागातील ३० गावात पर्यावरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपत गणेश उत्सव शांततेने उत्साहात साजरा करण्यास कन्हान पोलीस , नगर परिषद , ग्राम पंचायत प्रशासनाला योग्य सहकार्य करा. असे आवाहन मा. वंदना सवंरगपते उप विभागीय अधिकारी रामटेक हयानी उपस्थित मान्यवर व परिसरातील नागरिकांना आयोजित गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत केले.


मंगळवार (दि.३०) ऑगस्ट ला सायंकाळी ६ वाजता पोलीस विभाग कन्हान द्वारे गणेशोत्सव निमित्य शांतता समितीची बैठक कन्हान-पिपरी नगरपरिषद नविन इमारत येथे मा. वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्या अध्यक्षेत, मा. प्रशांत सांगोडे तहसिलदार पारशिवनी, मा योगेंद्र रंगारी उपाध्यक्ष नगर परिषद कन्हान, मा विलास काळे पोलीस निरिक्षक कन्हान , मा सुनिता मेश्राम सरपंचा टेकाडी (को.ख) आदीच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली. या प्रसंगी पत्रकार, सरपंच, उपसरपंच , पाेलीस पाटील , शांतता समिती सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सार्व जनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, डी.जे, मंडप, डेकोरेशन आणि प्रतिष्ठीत नागरिकांना गणोत्सव साजरा करताना घेण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सुचनाची माहीती मा. प्रशांत सांगोडे तहसिलदार यानी आपल्या मार्गदर्शनातुन दिली. गणपती स्थापना पासुन तर विसर्जना पर्यंत गणेशोत्सव साजरा करित असताना पर्यावरण पुरक व सामाजिक बांधिलकी जपत घरघुती व सार्वजनिक गणेश उत्सव शांततेने उत्साहात साजरा करण्यास कन्हान पोलीस व नगरपरिषद , ग्राम पंचायत प्रशासनाला योग्य सहकार्य करा. असे आवाहन मा. वंदना सवंरगपते उपविभागीय अधिकारी रामटेक हयानी उपस्थित मान्यवर व परिसरातील नागरिकांना गणेशोत्सव निमित्य शांतता समितीच्या बैठकीत केले.
या शांतता बैठकी स पत्रकार मालविये सर, मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, रविंद्र दुपारे, ऋृषभ बावनकर , रोहीत मानवटकर, ढिवर, भोई समाज संघटना अध्यक्ष सुतेश मारबते, सामाजिक कार्यकर्ता भुषण इंगोले, प्रशांत मसार, दिलीप राईकवार, प्रविण गोडे, दिपक तिवाडे, आशाताई पाहुणे सरपंचा निलज, वैशाली थोरात, नितु तिवारी सह पोलीस पाटील, मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, पोलीस व आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …