Breaking News

*कन्हान ला शिक्षक दिनी जेष्ठ सेवानिवृत्ती आणि शालेय शिक्षकांचा केला सत्कार* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला शिक्षक दिनी जेष्ठ सेवानिवृत्ती आणि शालेय शिक्षकांचा केला सत्कार*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३४ व्या जयंती चे औचित्य साधून जेष्ठ सेवानिवृत्ती आणि शालेय शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद नवीन इमारत मध्ये करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील वैद्यकीय अधिकारी मा.डॉ राठोड सर , प्रमुख पाहुणे जेष्ठ सेवानिवृत्ती व पत्रकार मालवीय सर , नप नगराध्यक्षा करुणा आष्टणकर , माजी नप उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक , बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके , मंच मार्गदर्शक भरत सावळे , डॉ.श्रद्धा झोडपे सह आदि मान्यवरांचा हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षक दिना निमित्य डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा आणि शहर विकास मंच पदाधिकार्यांचा हस्ते जेष्ठ सेवानिवृत्ती आणि शालेय शिक्षकांचा शाॅल , श्रीफल आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन विद्यार्थांना बॅग वितरित करुन आणि सर्वांना अल्पोहार वितरित करुन शिक्षक दिवस कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे , माजी मुख्याध्यापक आनंदराव कावळे , खर्चे सर , आर्दश हायस्कुल मुख्याध्यापिका चंद्रकला मेश्राम , सुनिता देशमुख , वर्षा सिंगाड़े , ताराचंद खंडाईत , रुपाली उके , नरेश तेलकापल्लीवार , एन.आर चव्हान , हर्ष पाटील , धर्मेंद्र गणवीर , चंदन मेश्राम , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , हरीओम प्रकाश नारायण , प्रवीण हुड , कृणाल राजपुत , आकाश पंडितकर , सह आदि मंच पदाधिकार्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …