*नितीन गडकरीच करू शकतात नरखेडमध्ये चमत्कार* *युवा कार्यकर्ते शेखर राऊत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट*

*नितीन गडकरीच करू शकतात नरखेडमध्ये चमत्कार*

*युवा कार्यकर्ते शेखर राऊत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट*

नरखेड़ प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – दूरदृष्टी नेता म्हणून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा नावलौकिक देशभर आहे त्यांना नरखेड तालुक्याच्या उपेक्षित पणाची जाण आहे त्यांनाही मनापासून नरखेड तालुक्याचा विकास व्हावा अशी तळमळ आहे,विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून गणलेला ला नरखेड तालुका खरोखरच मागे आहे. समजा याला एकदा समृद्ध करायचे झाल्यास महामार्गाने त्याला जोडावे लागेल,रस्ते झाल्यास नरखेड तालुक्यामध्ये उद्योग येतील फेरा मारण्याचा त्रास वाचेल, एकंदरीत पाहता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 47 ला व महामार्ग क्रमांक 6 ला जोडण्याचे कार्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच करू शकतात म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा अशी निवेदनाच्या माध्यमातून पिंपळगाव (राऊत) येथील युवा कार्यकर्ते शेखर ज्ञानेश्वरराव राऊत यांनी विनंती केली.
यावेळी सरपंच चंद्रशेखर राऊत, हंसराज राऊत राजेंद्र चौधरी,सुरेशराव राऊत,उमेश ठाकरे सुरेश भोयर,धनराज ढोकणे,भास्कर राऊत,गिरीधर पात्रीकर,चेतन राऊत,प्रशांत राऊत,पवन झोड उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …