*डेकोरेशन व्यावसायिकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू* *गणपती विसर्जनाच्या पर्वावरील दुर्दैवी घटना*

*डेकोरेशन व्यावसायिकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू*

*गणपती विसर्जनाच्या पर्वावरील दुर्दैवी घटना*

कळमेश्वर –गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी ऊशीरा रात्री डेकोरेशन साहित्य काढत असताना विजेचा धक्का लागून डेकोरेशन व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 9 तारखेच्या मध्यरात्री दरम्यान जे एस डब्ल्यू इस्पात कॉलनीमध्ये घडली. साजन नारायण पाटील असे मृतक युवकाचे नाव असून त्यांचा डेकोरेशन चा व्यवसाय होता.


प्राप्त माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे जेएसडब्ल्यू इस्पात कॉलनी मध्ये गणपतीची स्थापना होते गेल्या दहा ते बारा वर्षापासून गणपती कार्यक्रमाप्रसंगी मृतक साजन हा त्या ठिकाणी डेकोरेशन लावायचा. त्याला दुसरे दिवशी दुसऱ्या ठिकाणचा डेकोरेशन लावण्यासाठी ऑर्डर असल्याकारणाने विसर्जनानंतर गणपती मंडपात लागलेली सिरीज काढत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला विजेच्या शॉक लागला असताना त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी त्याच्या हातात असलेली जिवंत विद्युत तार काढण्याचा प्रयत्न केला असता तो खाली पडला यातच त्याच्या डोक्याला मार लागला सुरुवातीला त्याला जेएसडब्ल्यू कंपनीच्या डॉक्टरांनी तपासले परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याला पुढील उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले मृतक साजन हा कळमेश्वर येथील वार्ड क्रमांक 11 हुडको कॉलनीतील रहिवासी असून त्याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते त्याला एक मुलगी असून आई-वडील आणि भाऊ आहे घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला कंपनी प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे कळमेश्वर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …