*मोवाड पांढुर्णा रस्ते वर आपघाती खड्डे झाले जलमय*
*शेतकरी व शालेय विद्यार्थी व प्रवास त्रास सहन करावा लागतो*
नरखेड तालुका प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहर हे महाराष्ट्र च्या उत्तर सिमेला लागुन आहेत. यानंतर मध्यप्रदेश ची सिमेची सुरुवात होते.यामध्ये मध्यप्रदेश मधील वाहतूकचे वाहने व प्रवासी वाहतूक ही नेहमी मोवाड पांढुर्णा या क्रमांक २४५ या रस्ते वरुन रात्रन दिवस सुरू च असते. तसेच मोवाड शहरातील शेतकरी याची पण याच रस्ते वरून वाहतूक करत असते.
पण या रस्ते वर अनेक ठिकाणी मोठ्या मोठे खड्डे पटले आहेत. यामध्ये पाणी साचले असले मुळे खड्डे मध्ये कीती पाणी आहेत यांच्या अंदाज येत नाहीत .यामुळे कधी ही आपघात होईल हे सांगा येत नाही. हा रस्त्या नवीन निर्माण होणासाठी मंजुरी होऊन अनेक वर्षे झाल पण यांच्या अजून काम सुरू झाले नाही. तसेच यांच्या रस्ते चे कडेला लाईट ची पण व्यवस्था नाहीत. रात्री च्या वेळ ला प्रवास करणे म्हणजे जिव मुठीत घेऊन करावा लागतो.
म्हणून हा नवीन रस्ता निर्मातीचे कार्य लवकर लवकर सुरू करावे अशी मोवाड वासी जनता मागणी करत आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज