*वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः दि. 15/09/2022 रोजी सावनेर येथील ST महामंडळ आगार येथे आगार प्रमुख श्री रामटेके याना भेटून प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रम 13/00 ते 15/00वा पावेतो 50 ते 60 बस चालक तसेच इतर स्टाफ च्या उपस्थितीत घेण्यात आलेला आहे. कार्यक्रमात सपोनि,श्री मुसनवार,पोउपनी गौरखेडे,श्रेपोउपनी श्री लिपटे,सपोउपनी श्री गावंडे यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.*
*सदर वेळी खालील प्रमाणे वाहतुक नियमांचे पालनकरण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.*
*1) अवजड वाहन नेहमी दुसऱ्या लेन मध्ये चालवावे.,गणवेश नीटनेटका असावा, पूर्ण वेळ झोप घेऊनच वाहन चालवावे,वाहनांची स्थिती काय आहे ही खात्री करूनच वाहन चालवावे.2) वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा3) गाडीचे कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावी.4) ट्रिपल सिट प्रवास करु नये.५) दारू पिवून वाहन चालवू नये.6) मो.सायकल चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा7) वाहन चालवताना नेहमी वेगमर्यादा चे पालन करावे.8) नेहमी ओव्हरटेक करतांना उजव्या बाजूने करावे.9) गावांमधील रस्त्याने महामार्गावर येते वेळेस व महामार्ग ओलांडत असताना वाहतूक बघुन सुरक्षित पणे ओलांडणे.10)विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये.11) वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे.12) चारचाकी वाहन चालवताना चालक व सहप्रवासी यांनी सीटबेल्ट वापरावे.13) मोटर सायकल चालवताना नेहमी सर्व्हिस रोड चा वापर करावा ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड नसेल त्याठिकाणी शोल्डर लेन चा वापर करावा.14) महामार्गावर वाहन चालवताना आपले वाहन धोकादायक परिस्थितीत कोणतेही ठिकाणी थाबवू नये.15) वाहन चालवताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे कारण समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने पाठीमागील वाहनाने समोरील वाहनास धडक दिल्याने घडणाऱ्या अपघातांच्या प्रमाण वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.16) आपले अल्पवयीन/लहान मुलांना तसेच विना लायसन्स वाहन चालविण्यास देवु नये.17) ज्या वाहनांवर प्रलंबित तडजोड शुल्क आहेत त्यांनी ऑनलाईन/ म पो केंद्राशी संपर्क साधून भरून घ्यावेत.*
*याबाबत मार्गदर्शन करुन मृत्युंजय दूत संकल्पनेची तसेच इंटरसेप्टर वाहनांची माहिती देण्यात आली. तसेच स्व.मा.बाळासाहेब ठाकरे व शासनाचे इतर अपघात विमा योजनेची माहिती देण्यात आली*