*कल्पेश बावनकुळे हत्याकांड चे आरोपी कौन ? गुलदस्यात* *सात दिवस लोटुन ही आरोपी का सापडले नाही?* *तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी ; चंद्रशेखर बावनकुळे व रमेश कारेमोरे यांचे पोलीस अधिक्षकांना पत्र*

*कल्पेश बावनकुळे हत्याकांड चे आरोपी कौन ? गुलदस्यात*

*सात दिवस लोटुन ही आरोपी का सापडले नाही?*

*तात्काळ आरोपींना पकडण्याची मागणी ; चंद्रशेखर बावनकुळे व रमेश कारेमोरे यांचे पोलीस अधिक्षकांना पत्र*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील बोर्डा रोड वरील भारत पेट्रोलपंप समोर कल्पेश बावनकुळे याची शनिवार ते रविवार च्या मध्यरात्री अज्ञात दोन युवकांनी धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली . या घटनेने संपुर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन घटनेला सात दिवस झाल्यावर ही कल्पेश बावनकुळे हत्याकांड चे आरोपी अजुन ही गुलदस्त्यात असल्याने कन्हान पोलीसां च्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले आहे .


मागील अनेक दिवसान पासुन शहरात अवैध धंधे मोठ्या प्रमाणात बिनधास्त पणे सुरु असुन , चोरी , मारपीट , लुटमार सारखे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असुन कन्हान पोलीस प्रशासन या कडे र्दुलक्ष करीत असल्याने आम नागरिकांची सुरक्षा कोणाच्या भरोस्यावर अश्या चर्चेला उधाण आले आहे . सदर घटना गंभीर्याने घेत विविध राजकीय पक्षांचा नेत्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना निवेदन देऊन तात्काळ आरोपी पकडण्याची मागणी केली होती . परंतु पोलीसांना आरोपी पकडण्यात यश प्राप्त झाले नाही . त्यामुळे शहरात पोलीस प्रशासना विरुद्ध नागरिकांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने शहरात मोठा आंदोलन होण्याची शक्यता वर्तविली जात असुन तनावाची परिस्थिति निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे . या वर नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर , उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे हे कसली भुमिका घेतात या कडे नागरिकांचे लक्ष लागले असुन भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे व प्रहार जनशक्ती संघटन नागपुर जिल्हा अध्यक्ष रमेश कारेमोरे यांनी पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांना निवेदन पत्र देऊन तात्काळ आरोपी पकडण्याची मागणी केली आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …