*कन्हान जवळील हड्डी कपनीत आढळला १० फूट लांब अजगर*
*सर्प मित्रांनी अजगर ला पकडुन जंगलात सोडुन दिले जिवनदान*
*शासनाने आम्हाला मदत करावी – सर्पमित्र*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – शहरा पासून चार किमी. अंतरावर असलेल्या नेरी गादा शिवार येथील हड्डी कंपनी परिसरात कंपनी चे सुरक्षा रक्षक यांना कंपनी येथे कामावर असताना त्यान कंपनी परिसरात मागील बाजूस लावलेल्या जाळीत दहा फूट लांब अजगर आढळुन आल्याने आला कंपनी चे सुरक्षा रक्षक यांनी कन्हान येथील सर्प मित्र अविनाश पासपेलकर , राजकुमार बावने , मगेश मानकर यांना फोन करुन सुचना दिली असता सर्प मित्रांनी तात्काळ पोहचुन अजगर सापा ला पकडुन सुरक्षित वन विभागाचा सहायान जंगलात सोडले .
सद्या पावसाळा सुरू असून पावसाच्या दमट वातावरणात सरपटणारे प्राणी बिळाबाहेर येऊन संचार करीत असतात अशात नागरिकांना त्यापासून धोका उत्पन्न होत विषारी सापाच्या दंशाने अनेकजण दगावत असतात. मौजा नेरी गादा येथिल हड्डी कंपनीत माग च्या भागात असलेल्या जाळीत दहा फूट लांब अजगर असल्याची माहिती कन्हान येथील सर्प मित्र अविनाश पासपेलकर , राजकुमार बावणे व मंगेश मानकर यांना कंपनी चे सुरक्षा रक्षक व्दारे मिळाली. त्यांनी हड्डी कंपनीत जाऊन अजगराचे रेस्क्यू करून त्यास ताब्यात घेतले. सदर अजगर १० फूट लांब व १४ किलो वजनाचा होता. त्यास पकडून येथील निसर्गयुक्त जंगलात मुक्त करीत त्यास जीवदान दिले.
सर्पमित्र परिसरातील गावात राहत्या घरात व शेतात निघणाऱ्या विषारी , बिनविषारी या सारख्या अनेक सापांना पकडून जीवदान देण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहेत . मात्र त्यांना शासन स्तरा वरून कुठलीही मदत मिळत नाही. मागील दहा बारा वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालून सरपटणाऱ्या प्राण्यांना जीवदान देण्याचे कार्य करीत आहेत. त्याची दखल शासनाने घेऊन त्यांना मदत करण्याची मागणी सर्पमित्र अविनाश पासपेलकर, राजकुमार बावणे व मंगेश मानकर यांनी केली आहे.