*सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माया तागडे*

*सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माया तागडे*

नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

नरखेड – तालुकांतर्गत खंडाळा ( बु ) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. माया शंकरराव तागडे यांची गावातीलच सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी तर ऊपाध्यक्षपदी सेवकराम महल्ले यांची नुकतीच
पार पडलेल्या संस्थेच्या निवडनुकीत सर्वानुमते
बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडनुकीकरीता निवडणुक निर्णय अधिकारी
म्हणुन . खापरे यांनी काम पाहीले तर खंडाळा ( बु ) चे ग्रा.प.सरपंच रूपेश मुंदाफळे, तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ पांडे यांचे प्रमुख
उपस्थीतीत निवडणुक पार पडली. हा निवडणूकीचा कार्यक्रम नरखेड येथील विवीध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कार्यालयात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षपदी माया तागडे तर ऊपाध्यपदी सेवकराम महल्ले यांची बिनविरोध
निवड झाल्याबद्दल खंडाळा ( बु ) चे सरपंच रूपेश मुंदाफळे यांनी नियोक्त्यांना पुष्पहार
देऊन सन्मानीत केले. यावेळी सेवा सहकारी
संस्थेचे नवनिर्वाचित संचालक गंगाधर मुंदाफळे, अशोकराव फुके, पंढरी तागडे, इश्वर
मुंदाफळे, माया गो. मुंदाफळे, कांचनमाला मुंदाफळे, उत्तमराव मुंदाफळे, गोविंदराव मुंदाफळे, रूपम मुंदाफळे, तसेच माजी अध्यक्ष
हरीभाऊ पांडे यांनी संचालक मंडळातील सर्व नवनार्वाचीत सभासदांना अभिनंदन दीले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …