Breaking News

न्यु इंग्लिशचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेत विजय

न्यु इंग्लिशचे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धा


स्लग – विज्ञान प्रदर्शनी : ४५ व्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अव्वल

मोहपा प्रतिनिधि-राहुल आंजनकर

ता : ११ . एस़ एस़ इंटरनॅशनल स्कूल, गोटाड पांजरी येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञात प्रदर्शनीमध्ये कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील न्यु इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सोलर ड्रायर’ या मॉडलला प्रथम क्रमांक मिळाला असून हे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे़
९ ते ११ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) व मानेवाडा-बेसा मार्गावरील गोटाड पांजरी येथील एस़ एस़ इंटरनॅशनल स्कूल च्या संयुक्त विद्यमाने एस़ एस़ स्कूलमध्ये तीन दिवसीय 45 व्या नागपूर जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते़ 9 डिसेंबरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार याच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन पार पडले़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोहन गंधे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, रविनगर नागपूरचे संचालन रवींद्र रमतकर तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ़ एस़ एऩ पटवे व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, संस्थेचे कोषाध्यक्ष गौरव जयपूरीया, संस्थेचे सचिव अमित येनुरकर व माजी प्राचार्य डॉ़ केशव भांडारकर यांची उपस्थिती होती़
या तीन दिवसीय स्पर्धेत १३० स्पर्धक सहभागी झाले होते़ १३० स्पर्धकातून ११ स्पर्धकांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली़ यात कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील न्यु इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘सोलर ड्रायर’ या मॉडेलला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला़ आता हे विद्यार्थी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी पात्र झाले आहेत़ विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मोहपा शिक्षण संस्थेच्या संचालिका कुंदा विजयकर, सचिव यशवंत लांडे व शाळेचे मुख्याध्यापक अरूण सोमकुंवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे़

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …