*कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिर थाटात संपन्न* *नागरिकांनी मोठ्या संख्येत शिबीराचा घेतला लाभ*

*कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिर थाटात संपन्न*

*नागरिकांनी मोठ्या संख्येत शिबीराचा घेतला लाभ*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांद्री येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येत लाभ घेऊन शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आले .

शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर ला आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हाधिकारी मा.डॉ विपीन इटनकर , जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रश्मी बर्वे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री योगेश कुंभेजकर , पंचायत समिती सभापती सौ.मिना कावळे , सरपंच बलवंत पडोळे , जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे , उपसभापती चेतन देशमुख , उपसरपंच श्यामकुमार बर्वे सह आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते . नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र , उत्पन्न प्रमाण पत्र , आधारकार्ड, राशन कार्ड , मतदानकार्ड व मतदान नोंदणी या प्रकार ची कामे पुर्ण करण्यात प्राधान्य देण्यात आले . नागरिकांना या सारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल असा आशावाद सर्व प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन श्री खिमेश बढिये यांनी केले , प्रास्ताविक तहसिलदार श्री प्रशांत सांगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी श्री सुभाष जाधव यांनी व्यकत केले .

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी वंदना सवंगपते , तहसिलदार प्रशांत सांगळे , गट विकास अधिकारी श्री सुभाष जाधव , गटशिक्षणाधिकारी सौ वंदना हटवार , नायब तहसीलदार रणजित दुसावार , केंद्र प्रमुख लता मालोदे , श्री बेंदले , सेतु केंद्र कन्हान चे शरद वाटकर , श्री सतीश भसारकर , कांद्री व कन्हान शाळेतील सर्व मुख्याध्यापक , कांद्री ग्राम पंचायतचे सचिव श्री दिनकर इंगळे व ग्राम पंचायत कांद्री येथील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले . कांद्री , कन्हान , सिहोरा , खेडी , बोरी , बोरडा , निमखेडा , निलज , खंडाळा , वराडा , टेकाडी , घाटरोहणा , केरडी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत या शिबिराचा लाभ घेऊन शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …