*माती परिक्षण शिबीर संपन्न*

*विशेष प्रतिनिधी नरखेड*
नरखेडःपतंजली भारत स्वाभिमान ट्रस्ट नरखेड च्या वतीने *”धरती का डॉक्टर”* च्या प्रशिक्षण वर्गाचे तिसरे सत्र पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड येथे दिनांक ९/१२/ २०१९ ला आयोजित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड चे प्राचार्य श्री डॉक्टर जयंत जी जावंजाळ सर लाभले .तसेच कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री स्नेहलजी व श्री यांनी उपस्थित धरतीच्या डॉक्टरांना मार्गदर्शन व शंकासमाधान केले . स्नेहल जी यांनी माती परीक्षणात येणारे उपयुक्त किट साहित्य ची ओळख करून दिलीं व माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले.

शेती मोती परीक्षणाचा कार्यक्रम संपूर्ण नागपूर तहसीलच्या 13 तालुक्यात आयोजित करण्यात येत आहे .हा कार्यक्रम पतंजली हरिद्वार व केंद्र शासन याच्या विद्यमाने आयोजित होत आहे. हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर नागपूर जिल्ह्यामध्ये घेण्यात येत आहे .मातीचे परीक्षण प्रशिक्षित विद्यार्थी शेतीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निशुल्क करणार आहेत. त्यावेळी ते आवश्यक ती माहिती शेतकऱ्याकडून गोळा करतील .त्यानंतर ते मातीमध्ये असणारे ऑरगॅनिक कार्बन, नत्र, स्फुरद, पोटॅश, मातीचा पीएच ची तपासणी करणार आहेत. याचा रिपोर्ट शेतकऱ्याला त्याच वेळी देतील.यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्राचार्य श्री जयंत जी जवांजलसर यांनी शेती मातीपरीक्षणाच्या कार्यक्रमाची स्तुती केली व माती परीक्षण उपयुक्तता शेतकऱ्यांना किती अधिक आहे हे समजावून सांगितले .त्यावेळी त्यांनी तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेच्या ओव्या चां दाखाला दिला. आपले हे काम राष्ट्रीय काम आहे हे सांगून त्यांनी भावी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाचे संचलन भारत स्वाभिमान तालुका नरखेड प्रभारी श्री पुरुषोत्तम थोटे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून त्यांनी पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. केले तसेच तालुका कृषी किसान प्रमुख श्री सुरेश जी पंढरकर यांनी धरती डॉक्टर कार्याचे महत्व पुढच्या भवितव्य व रोजगाराच्या पुढील संधी याविषयी सविस्तर माहिती दिली .व सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाला विवेक बालपांडे. लखन कळंबे. यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला संपूर्ण नरखेड तालुक्यातून 35 ते 40 प्रतिनिधी हजर होते.
Maharashtra News Media सच की आवाज