Breaking News

चक्क तहसीलदाराच्या दालनात शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न.

ब्रेकिंग न्यूज

चक्क तहसीलदाराच्या दालनात शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न.

(जिवती येथील घटना/तहसीलदारावर कारवाईची मागणी)

आवारपूर प्रतिनिधि-गौतम धोटे

जिवती तहसीलदार कार्यालयाच्या दालनात तहसीलदारासमोर एका शेतकऱ्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.कीसन सानप असे शेतकऱ्याचे नाव असून यांचा जमीनीचा वाद सुरु आहे परंतु तहसीलदार हे एकतर्फी भुमीका घेऊन सातत्याने अनेकदा वेढीस धरले त्यांना तारखेवर बोलवून धाकदपट करून त्यांना चुकीच्या पद्धतीने दंडात्मक कारवाई करणे व कार्यालय सुटेपर्यंत बसून ठेवणे,जमानतीसाठी पैशांची मागणी करने तसेच वेळोवेळी धमकावण्याच्या प्रकारामुळे शेतकरी कंटाळला शेवटी तहसीलदारचा जाचामुळे कंटाळून टोकाची भूमिका घेत आपली जीवनयात्रा संपवण्यासाठी थेट तहसीलदार बेडसे यांच्या कार्यालयात(क्याबीन)मध्ये घुसून “काय साहेब तुम्ही माझा कुटुंब संपविण्यासाठी याठिकाणी बसले आहात का” असे म्हणत विषप्राशन करत आता साहेब माझा अंतिमसंस्कार तुम्हीच करा असे म्हणत जागीच कोसळले या घटनेमुळे परिसरातील वातावरण तापले असून सर्व क्षेत्रांतून सदर घटनाचा निषेध होत आहे.आणि तहसीलदारावर कारवाईची मागणी होत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …