Breaking News

*युवतीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा*

*युवतीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा*

गढ़चिरोली प्रतिनिधि -सूरज कुकुडकर

गडचिरोली ता.१२: युवतीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या इसमास येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व ६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुनील मारोती चिमुरकर(४५)रा.एकोडी,ता.चामोर्शी असे दोषी इसमाचे नाव आहे.

ही घटना २४ ऑगस्ट २०१८ ची आहे. या दिवशी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पीडित युवती आपल्या गावी असताना सुनील चिमुरकर याने तिला सायकलवर बसवून आपल्या गावी नेले. त्यानंतर घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडितेने चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी सुनील चिमुरकर याच्यावर भादंवि कलम ३७६(फ) व ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. फिर्यादी व अन्य साक्षदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सुनील चिमुरकर यास भादंवि कलम ३७६(फ)अन्वये १० वर्षांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३२३ अन्वये एक वर्षाचा कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …