*डिवाईन लॉज वर सुरु असलेल्या देह व्यवसाया वर छापा टाकुन ५ मुलींची केली सुटका* *कारवाई दरम्यान ३५,२०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त , तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल* *अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक , भरोसा सेल , आणि आर्थिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई*

*डिवाईन लॉज वर सुरु असलेल्या देह व्यवसाया वर छापा टाकुन ५ मुलींची केली सुटका*

*कारवाई दरम्यान ३५,२०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त , तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक , भरोसा सेल , आणि आर्थिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई*

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर-जबलपूर महामार्गा वरील टोल प्लाझा जवळील कांद्री (कन्हान) येथील डिवाईन रेस्टाॅरेंट अॅंन्ड लाॅज वर पोलीसांनी बुधवार ला सायंकाळी ६:३० वाजता च्या दरम्यान छापा टाकुन देह व्यवसायाचा पर्दाफाश करुन पाच मुलींची सुटका केली आहे .

पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेला डिव्हाईन रेस्टॉरंट आणि लॉजिंगमध्ये पैशाचे लालच दाखवून बाहेरच्या राज्यातून आणि मोठ्या शहरांतून मुलींच्या देह व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती . सदर घटनेच्या माहिती वरुन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष , भरोसा सेल , आर्थिक गुन्हे शाखे च्या पोलीसांनी संयुक्त पणे पंचांच्या उपस्थितीत लॉजवर छापा टाकला . यावेळी नागपूर , पश्चिम बंगाल आणि उल्हास नगर-कल्याण येथील प्रत्येकी दोन – दोन मुली लाॅज वर मिळुन आल्या . पोलीसांनी मुलींना विचारफुस केली असता त्यांनी पैसे देऊन देह व्यवसायासाठी बोलावले जात असल्याची माहिती दिली .

पोलीसांनी लाॅज ची झडती घेतली असता त्या मध्ये काही आक्षेपार्ह वस्तूं मिळुन आल्याने पोलीसांनी ३५,२०९ रुपयांचा मुद्देमाल आणि १० हजार रुपये किंमती चा मोबाईल जप्त करुन लाॅज चे कर्मचारी आरोपी माणिक भोवते , स्वराज राजु हिरोले आणि एक पिडित महिलेला विचारफुस केली असता त्यांनी मुलींना देह व्यवसायासाठी आणल्याची कबुली दिल्याने कन्हान पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक मिरा अनिल मटाले यांचा तक्रारी वरून आरोपी १) माणिक शामराव भोवते , २) स्वराज राजु हिरोले ३) एक पिडिता महिला यांचा विरुद्ध कलम ३,४,५, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करुन सुटका करण्यात आलेल्या मुलींना नागपुरातील महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

सदर कारवाई अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी , पोलीस उपनिरीक्षक मिरा मटाले , कॉन्स्टेबल ज्योती वानखेडे, हेड कॉन्स्टेबल अर्चना कांबळे , भरोसा सेल पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुमुदिनी पाथोडे , स्वाती लोखंडे , हवालदार आसिफ सय्यद , गजेंद्र निंबेकर यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …